Ladki Bahin Yojana New Update News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर मिळाला 1500 रुपये सरकार देत आहे परंतु लाडकी बहीण योजनेतील जवळपास 4500 महिलांनी अर्ज माघारी घेतलेली माहिती समोर येत आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी खोटी माहिती भरून योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलावर कारवाई होणार का ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली ह्या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली या योजनेचे लाभ घेऊ महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना लागू केली आहे
या योजनेचे अर्ज प्रक्रिया सरकारने 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ठेवली होती या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे 3 कोटी पेक्षा अधिक महिलांचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते त्यामधील सरकारने 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे.
हे पण वाचा : आरटीआय प्रवेश प्रक्रिया झाली सुरु, आशा प्रकार करा Online अर्ज प्रवेश रद्द होणार,लगेच पहा सविस्तर माहिती
अपात्र असून लाभ घेणाऱ्या महिलावर कारवाई होणार ?
अपात्र असूनही अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिलावर सरकार कारवाई करणार का ?असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे या संदर्भात राज्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली असता खोटी माहिती सादर करून लाभ घेत असलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेतले जाणार असे त्यांनी स्प्ष्ट सांगितले.
![Ladki Bahin Yojana New Update](https://mhnews24.com/wp-content/uploads/2025/01/Ladki-Bahin-Yojana-New-Update-1024x538.webp)
त्याचप्रमाणे सरकारच्या कारवाईला वाचण्यासाठी निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे व अशा महिलांवर सरकार कारवाई करणार नाही व त्यांचे पैसे पण परत घेतले जाणार नाही.
1 thought on “Ladki Bahin Yojana New Update : खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे पैसे परत घेणार मंत्री तटकरेंनी दिली माहिती”