RTI Admission 2025-26 Maharashtra News Marathi : मुंबई राज्य महामंडळाच्या 285 शाळांमध्ये 4685 जागा आहेत इतर महामंडळाच्या 72 शाळांमध्ये 1368 जागा आहेत अशा प्रकारे एकूण संख्या 327 शाळेमध्ये 653 जागा आहेत मागील वर्षी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 573 शाळांमधील सुमारे 4451 जागेसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया झाली होती त्यामध्ये 14217 अर्ज संख्या होती आणि आता 2025-26 साठी जिल्ह्यातील 559 शाळेने नोंदणी केली आहे.
तर आज आपण आरटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची पात्रता काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
RTI Admission 2025-26 Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे असलेली आरटीआय यामध्ये शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता पालकांना आपल्या मुलांसाठी 14 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करावे लागेल.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते प्रत्येक शाळेतील 25% जागा या आरटीआय प्रवेश कोट्यासाठी राखीव ठेवल्या जातात या विद्यार्थ्यांचे शालेय सरकारच्या माध्यमातून दिले जाते सध्याच्या आरटीआय प्रवेश पोर्टल वरील आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यभरात 8490 शाळेची नोंद झालेली आहे त्यामध्ये एक लाख तीन हजार सहाशे चोवीस जागा उपलब्ध आहेत.
RTI Admission Important Date
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 14 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
RTI Admission Eligibility
- पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना यामध्ये प्रवेश दिला जातो
- यापूर्वी 25% आरटीआय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना पुन्हा अर्ज करता येणार नाही
हे पण वाचा : कोणतीही परिक्षा नाही,भारतीय टपाल विभागात थेट 25,200 पदांची मेगा भरती
RTI Admission 2025-26 Online Apply
आर टी आय प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे .
- सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर ( https://student.maharashtra.gov.in/ ) भेट द्यावी लागेल
- तुमच्यासमोर अधिकृत संकेतस्थळ ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला New Registration करावी लागेल.
![RTI Admission 2025-26 Maharashtra](https://mhnews24.com/wp-content/uploads/2025/01/RTI-Admission-2025-26-Maharashtra-1024x538.webp)
- New Registration झाल्यानंतर लॉगिन करून घ्यायचा आहे .
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आरटीआय प्रवेश अर्ज ओपन होईल .
- त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
- अर्ज भरताना पालकांना दहा शाळेचा पर्याय दिलेला असेल
- सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर पुन्हा एकदा माहिती तपासून घ्यावी
- आता तुम्हाला शेवटी सबमिट ह्या पर्यायावर क्लिक कराव लागेल
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल ते पावती तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे.
अर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://student.maharashtra.gov.in/ )भेट देऊ शकता किंवा शाळेतील शिक्षकांशी भेट देऊन अर्ज संबंधित माहिती प्राप्त करून अर्ज सादर करू शकता.
3 thoughts on “RTI Admission 2025 : आरटीआय प्रवेश प्रक्रिया झाली सुरु, आशा प्रकार करा Online अर्ज प्रवेश रद्द होणार,लगेच पहा सविस्तर माहिती”